आतापर्यंत केंद्र सरकारद्वारे देशातील शेतकर्यांना यशस्वीरीत्या 12 हप्ते पाठविण्यात आले आहे. अलीकडेच ऑक्टोबर महिन्यात केंद्र सरकारने (Central Government of India) शेतकर्यांच्या खात्यावर 12 वा हफ्ता पाठविला आहे. हे पैसे डीबीटीद्वारे पाठविण्यात येतात. मिळालेल्या माहितीनुसार 8 कोटी पेक्षा जास्त शेतकर्यांना 16 हजार कोटी हस्तांतरित केले आहे. पण महत्वाची माहिती अशी की अलीकडे पीएम किसानचे हफ्ते मिळण्याच्या संदर्भात बर्याच शेतकर्यांच्या तक्रारी ऐकायला येत आहे. (PM Kisan Scheme)..
अलीकडेच असे अनेक शेतकरी आहेत की ज्यांना पीएम किसान योजनेचा 12 वा हफ्ता मिळाला नाही. याला अनेक कारणे आहेत. त्यापैकी आधार क्रमांक बरोबर दिलेला नसणे, बँक अकाऊंट नंबर मध्ये देखील चूक असणे तसेच अजून पर्यंत E-kyc झालेली नसणे हे कारणे आहेत. त्यासाठी तुम्ही एक काम करू शकता.
तुमच्या मोबाइल वरून pmkisan.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन तुम्ही तिथे दिलेल्या माहितीची शहानिशा करू शकता. जर तुमच्याकडून ही प्रक्रिया मोबाइल वर करणे शक्य नसेल तर जवळील CSC सेंटरला भेट देऊन चौकशी करून घ्या. किंवा तुम्ही पीएम किसान योजनेशी संबधित संपर्क क्रमांक व ईमेल वर तक्रार देखील करू शकता.
या नंबर वर करा तक्रार
योजने संदर्भात तक्रार किंवा मदतीसाठी याठिकाणी ईमेल व संपर्क क्रमांक देण्यात आलेला आहे. येथे संपर्क करून तुम्ही आपली माहिती देऊ शकता. त्यासाठी एक टोल फ्री क्रमांक आहे – 1800115526, 011-23381092 तसेच ईमेल देखील करता येतो. योजने संदर्भात काहीही माहितीसाठी pmkisan-ict@gov.in या ईमेल वर वर ईमेल पाठविता येतो.
नोव्हेंबर ०७, २०२२
Tags :
2022
,
सरकारी योजना
,
Pm Kisan
,
pm modi
Subscribe by Email
Follow Updates Articles from This Blog via Email




No Comments