शेतकऱ्यांना मिळणार 30 हजार आर्थिक मदत. ज्या शेतकऱ्यांची दुधाळ किंवा इतर जनावरे लम्पी आजाराने दगावली असतील आशा शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने 30 हजार ते 16 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे.
शेतकऱ्यांना दिली जाणारी ही मदत राष्ट्रीय आप्पती निवारण धोरणामधील निकषानुसार दिली जाणार आहे.
केंद्राने प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 यानुसार लम्पी हा जनावरांना होणारा चर्म रोग अनुसूचित करण्यात आलेला आहे.
सध्या महाराष्ट्र राज्यातील एकूण 21 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जनावरांना हा रोग झालेला आहे.
सगळ्यात अगोदर हा लम्पी चर्मरोग दिनांक 4 ऑगस्ट 2022 रोजी महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यामध्ये आढळून आला होता.
त्यानंतर महाराष्ट्रतील 21 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पशुधनास या रोगाची लागण झाली. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या पशुधनास लम्पी हा रोग झालेला आहे अशा शेतकऱ्यांना आता शासनाकडून अनुदान दिले जाणार आहे.
शेतकऱ्यांना मिळणार 30 हजार रुपये आर्थिक मदत निकष खलीलप्रमाणे
ज्या शेतकऱ्यांना 30 हजार रुपये आर्थिक मदत मिळणार आहे ते खलील पद्धतीने मिळणार आहेत.
1) ज्या शेतकऱ्यांकडे दुधाळ जनावरे असतील आणि ही जनावरे या रोगाने प्रभावित झाली असतील तर अशा पशुपालकांना 30 हजार रुपये प्रती जनावर या प्रमाणे 90 हजार आर्थिक मदत दिली जाणार आहे. शेतकऱ्यांकडील केवळ तीनच जनावरांना याचा लाभ मिळणार आहे.
2) जनावरांचा मृत्यू लम्पी रोगाने झाला असेल तरच ही मदत दिली जाणार आहे.
तर अशा पद्धतीने शेतकऱ्यांना लम्पी आजाराने जनावरे दगावले तर आर्थिक मदत मिळणार आहे.
शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
शेती पूरक व्यवसाय म्हणून अनेक शेतकऱ्यांकडे दुधाळ जनावरे असतात. अशावेळी या जनावरांना लम्पी रोग झाला तर खूप मोठे आर्थिक नुकसान शेतकऱ्यांना सहन करावी लागते.
केवळ दुधाळ जनावरेच नव्हे तर शेतीसाठी लागणारे बैल देखील शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचे आहेत.
दुधाळ जनावरांना लम्पी झाला तर दुधावर परिणाम होतो आणि बैलांना जर हा रोग झाला तर शेतीकामावर परिणाम होतो.
अशावेळी शेती मशागतीची कामे व दुग्धव्यवसाय प्रभावित झाल्याने खूप मोठे नुकसान होते.
यामुळे शासनाच्या वतीने दिली जाणारी ही मदत नक्कीच शेतकऱ्यांना सहाय्य ठरणार आहे.
ज्या शेतकऱ्यांच्या दुधाळ जनावरांना लम्पीरोग झाला आहे आणि त्यामुळे मृत्यू झाला आहे त्यांना एका जनावरांसाठी 30 हजार याप्रमाणे 3 जनावरांसाठी 90 हजार मदत मिळेल
ही मदत फक्त लम्पी रोगाने मृत्यू झालेल्या जनावरांसाठी आहे
हा लेख पूर्ण वाचल्यास योजनेची पूर्ण माहिती मिळेल. यासंदर्भात शासन निर्णय देखील तुम्ही बघू शकता
Subscribe by Email
Follow Updates Articles from This Blog via Email




No Comments