या बरोबरच सरकारने योजनेचे लाभ सुरु राहण्यासाठी ई-केवायसी भरणेही अनिर्वाय केले आहे. वास्तविक सरकारने पीएम किसान सन्मान योजनेत होत असलेल्या फसवणुकीच्या घटना थांबवण्यासाठी हे बदल केले आहेत. या योजनेत कुटुंबाचा एक सदस्य पती किंवा पत्नीच पैसे घेऊ शकतात. सरकारने स्पष्ट केले आहे, की ज्या शेतकऱ्यांजवळ राशन कार्ड आहे, त्यांनी पीएम किसान सन्मान निधीच्या अधिकृत संकेतस्थळ www.pmkisan.gov.in वर जाऊन आपली नोंदणी करु शकतात. या व्यतिरिक्त शेतीचा सातबारा, आधार कार्ड, मोबाईल क्रमांक आणि बँक खात्याचा क्रमांक असणे आवश्यक आहे. या बरोबरच संकेतस्थळावर राशन कार्ड क्रमांकासह मागितलेले कागदपत्रांची साॅफ्ट काॅपी अपलोड करणे ही आवश्यक आहे.
ई-केवायसी आहे आवश्यकशेतकऱ्यांना (Farmer) ई-केवायसी करण्यासाठी ३१ जुलै २०२२ पर्यंत मुदत दिली गेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यांना लाभ मिळालेला नाही. जर तुम्ही ई केवायसी केले नसेल तर लवकरात-लवकर ते करा.
Subscribe by Email
Follow Updates Articles from This Blog via Email




No Comments