दहावी निकाल 2022 | Maharashtra 10th/SSC Result 2022 Date and Time | SSC चा निकाल 2022
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे ने 15 मार्च 2022 ते 4 एप्रिल 2022 या शैक्षणिक वर्ष 2021-2022 साठीच्या SSC बोर्डाच्या परीक्षा विविध केंद्रांवर यशस्वीपणे पार पाडल्या. महाराष्ट्र बोर्डाच्या एसएससी परीक्षेत दरवर्षीप्रमाणे मोठ्या संख्येने विद्यार्थी बसले आहेत आणि आपल्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. SSC Result 2022 साठी आता जास्त वाट पाहायची गरज नाही. SSC Result 2022 आज म्हणजेच 17 जून 2022 रोजी दुपारी 1 वाजता जाहीर केला जाणार आहे.
महाराष्ट्र एसएससी बोर्ड निकाल 2022 पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे. कारण या वेबसाईट वरती निकाल जाहीर केला जाणार आहे, त्या वेबसाईट वरती तुम्ही निकाल चेक करू शकता. निकाल तपासण्याचे नावानुसार, एसएमएसद्वारे, शाळानिहाय आणि रोल नंबरनुसार असे अनेक मार्ग आहेत. तुमचे स्कोअरकार्ड आणि विषयानुसार गुण पाहण्यासाठी तुम्ही कोणतीही पद्धत निवडू शकता. दहावीचा निकाल कसा चेक करायचा हे सुद्धा आम्ही या पोस्ट मध्ये सांगणार आहोत. त्यामुळे पोस्ट शेवटपर्यंत वाचा.
दहावी निकाल 2022 – SSC Result 2022 Details
| बोर्डाचे नाव – | महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे |
| परीक्षेचे नाव – | SSC Exam / 10th |
| परीक्षेची तारीख – | 15 मार्च ते 4 एप्रिल 2022 |
| निकालाची तारीख – | 17 जून 2022 |
| निकालाचा वेळ – | दुपारी १ वाजता |
| निकाल मोड – | ऑनलाईन |
| वेबसाईट – | mahresult.nic.in |
दहावी निकाल 2022 तारीख आणि वेळ – SSC Result 2022 Date and Time
2022 च्या महाराष्ट्र बोर्डाच्या एसएससी परीक्षेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड आहे आणि हे सर्व विद्यार्थी बऱ्याच काळापासून निकालाची वाट पाहता आहेत. न्यूजमध्ये सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र बोर्डाचा अधिकृत विभाग 10 वी (SSC) चा निकाल 17 जून 2022 रोजी जाहीर करेल आणि निकालाच टाईम ची चर्चा केली तर तो दरवर्षी प्रमाणे दुपारी १ लाच जाहीर केला जाईल.
महाराष्ट्र बोर्ड 10वीच्या निकालाची तारीख आणि वेळ वरील वरती टेबलमध्ये दिलेल्या त्यांच्या अधिकृत वेबसाइट पोर्टलवर अपलोड केलेली आहे. नाव, रोल नंबर आणि जन्मतारीख यासारख्या लॉगिन क्रेडेंशियल्सच्या मदतीने विद्यार्थी एसएससी निकाल डाउनलोड करू शकतात. महाराष्ट्र बोर्डाच्या 10वीच्या निकालाबाबत अधिक अपडेट्ससाठी आमच्या ब्लॉग ला भेट देत राहा.
दहावी निकाल 2022 वेबसाईट लिंक – SSC Result 2022 Website Link
तुम्हाला 10 वी बोर्ड निकाल 2022 महाराष्ट्र बोर्ड डाउनलोड संबंधित चे सर्व नवीनतम अपडेट mahresult.nic.in या वेबसाईट वरती मिळतील. बोर्ड आता या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करत असून हे अपडेट व्हायला थोडा वेळ लागेल असे सांगितले जात होते परंतु आता जास्त वाट पाहण्याची गरज नाही 17 जून 2022 ला निकाल जाहीर केला जाणार आहे. निकाल अपडेट केवळ अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित केले जातील.
खालील वेबसाईट वरती 10th Result 2022 जाहीर केला जाणार आहे –
दहावी (SSC) चा निकाल कसा बघायचा – How to Check SSC Result 2022
महाराष्ट्र बोर्ड SSC निकाल 2022 नावानुसार अधिकृत घोषणेनंतर अधिकृत वेबसाईटवरती उपलब्ध होईल. कारण अधिकृत लिंक व्यतिरिक्त निकाल मिळवण्यासाठी आमच्याकडे दुसरी लिंक अजूनही समोर आलेली नाही. त्यामुळे तुम्ही अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करावी आणि झटपट निकाल अपडेट्ससाठी कनेक्ट राहावे.
दहावी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.
- सर्वात आधी https://mahresult.nic.in/ या वेबसाईट ला भेट द्या.
- आता Maharashtra SSC Board 2022 Results या पर्यायावरती क्लिक करा.
- आता आपला Roll Number, Date of Birth आणि आईचे नाव योग्य ठिकाणी प्रविस्ट करा.
- सर्व योग्य केल्यावर Submit बटन वर क्लिक करा.
- आता आपला निकाल ओपन होईल. तो चेक करा आणि PDF च्या स्वरूपात डाउनलोड करून ठेवा.
Subscribe by Email
Follow Updates Articles from This Blog via Email





नवनाथ बालाजी गवळी
उत्तर द्याहटवा