ई-श्रम पोर्टलवर नोंदणीचा रेकॉर्ड, 25 कोटी कामगारांनी केली नोंदणी
ई-श्रम पोर्टलवर (e-SHRAM) कामगार नोंदणीचा उच्चांक प्रस्थापित झाला आहे. सहा महिन्यांपूर्वी सुरुवात झालेल्या या सरकारी पोर्टलने कामगारांचा (Unorganised workers) विश्वास जिंकला आहे. कामगारांच्या नोंदणीची संख्या सहा महिन्यांतच 25 कोटींवर पोहोचली आहे.केंद्र सरकारचे कामगार व रोजगार मंत्री (Labour and Employment Minister) भूपेंद्र यादव यांनी याविषयी माहिती दिली. असंघटीत क्षेत्रातील 38 कोटी कामगारांची माहिती ठेवण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांनी ऑगस्ट 2021 मध्ये ई-श्रम पोर्टल सुरू केले होते.या पोर्टलच्या माध्यमातून बांधकाम कामगार, स्थलांतरित कामगार, रस्त्यावरील विक्रेते आणि घरेलू कामगार यासारख्या असंघटित क्षेत्रातील कामगारांची नोंदणी करण्याचे सरकारचे उद्दीष्ट आहे.
विम्याचे संरक्षण
देशात पहिल्यांदाच ई-श्रम पोर्टलमार्फत 38 कोटी असंघटित कामगारांची नोंदणीचा ध्यास घेण्यात आला. त्यासाठी एक प्रणाली आखण्यात आली. या पोर्टलवर कामगारांच्या नोंदणी सोबतच केंद्र आणि राज्य सरकारमार्फत राबविण्यात येणा-या विविध सामाजिक सुरक्षा योजनांचे लाभ ही देण्यात येणार आहे. eSHRAM पोर्टलवर प्रत्येक नोंदणीकृत सदस्याला 2 लाख रुपयांचे अपघाती विमा संरक्षण मिळणार आहे. तसेच कामगाराचा अपघाती मृत्यू झाल्यास अथवा त्याला कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये आणि अंशतः अपंगत्व आल्यास 1 लाख रुपये मिळतील.
मार्च ०९, २०२२
Tags :
e-shram
Subscribe by Email
Follow Updates Articles from This Blog via Email




No Comments