भारतीय टपाल विभाग, (Indian Post) ने मेल मोटर सर्व्हिस, मदुराई मध्ये स्टाफ कार ड्रायव्हर पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार 17 मे 2022 पर्यंत त्यांचे अर्ज सादर करू शकतात. त्यासाठी त्यांनी अर्ज भरून खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे. भरतीची अधिसूचना आणि इतर माहितीसाठी, indiapost.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
भरतीसाठी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार (Indian Post Bharti 2022), एकूण 4 रिक्त पदे याद्वारे भरली जातील. ज्यामध्ये वेगवेगळ्या विभागातील प्रत्येकी एका पदाचा समावेश आहे. या पदांवर निवडलेल्या उमेदवारांना मॅट्रिक्स लेव्हल 2 अंतर्गत वेतनश्रेणी दिली जाईल.
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
शैक्षणिक पात्रता
10वी उत्तीर्ण उमेदवार कर्मचारी कार चालक पदांसाठी अर्ज करू शकतात. तसेच उमेदवाराला वाहन चालविण्याचा ३ वर्षांचा अनुभव असावा.
वय श्रेणी
कमाल 56 वर्षांपर्यंतचे उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. तपशीलवार माहितीसाठी सूचना तपासा.
पगार : १९,५०० /-
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज कसा करायचा
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी अधिसूचनेमध्ये दिलेल्या नमुन्यात त्यांचा अर्ज भरावा लागेल आणि तो ‘वरिष्ठ व्यवस्थापक, मेल मोटर सेवा, तल्लाकुलम, मदुराई – 625002’ या पत्त्यावर पाठवावा लागेल.
Subscribe by Email
Follow Updates Articles from This Blog via Email




No Comments