SBI SCO Recruitment 2022: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना चांगल्या नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या 'स्टेट बँक ऑफ इंडिया'मध्ये स्पेशल कॅडर ऑफिसर पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. इच्छुकांना sbi.co.in या अधिकृत वेबसाइटवर अर्ज दाखल करता येईल.
इच्छुकांना 25 फेब्रुवारी 2022 पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. स्पेशल कॅडर ऑफिसर या पदाच्या 48 जागा भरण्यात येणार आहे. अर्ज करण्यासाठी आता काहीच दिवस शिल्लक आहेत. sbi.co.in या संकेतस्थळावर सर्व माहिती उपलब्ध असून उमेदवाराची निवड झाल्यास दरमहा 60000 रुपये इतके वेतन मिळू शकेल.
>> महत्त्वाची माहिती
ऑनलाइन अर्ज सादर करण्यास सुरुवात: 5 फेब्रुवारी 2022
ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 25 फेब्रुवारी 2022
>> पदांची संख्या
असिस्टंट मॅनेजर (नेटवर्क सिक्युरिटी स्पेशलिस्ट) – १५ पदे
असिस्टंट मॅनेजर (रूटिंग आणि स्विचिंग) – ३३ पदे
>> शैक्षणिक पात्रता
'असिस्टंट मॅनेजर नेटवर्क सिक्युरिटी स्पेशालिस्ट' पदांसाठी कोणत्याही विषयातील पदवीधर अर्ज करू शकतो. या उमेदवाराने पदवी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.
'असिस्टंट मॅनेजर रूटिंग अँड स्विचिंग' साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून किमान 60% गुणांसह पदवी असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय कमाल ४० वर्षे असावे.
महत्वाची माहिती
अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना बायोडेटा, आयडी पुरावा, वयाचा पुरावा, शैक्षणिक पात्रता, अनुभव इत्यादी सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. त्यानंतर लेखी व मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.
Subscribe by Email
Follow Updates Articles from This Blog via Email




No Comments