पंजाब नॅशनल बँकेत मुंबई येथे ‘शिपाई’ पदांसाठी भरती, त्वरित अर्ज करा
पंजाब नॅशनल बँक मुंबई (Punjab National Bank Mumbai) येथे शिपाई या पदासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची 10 फेब्रुवारी 2022 तारीख असणार आहे.
पदाचे नाव :
१) शिपाई (Peon) – एकूण जागा 20
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक असणार आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक असणार आहे. उमेदवारांना इंग्रजी आणि मराठी भाषांचं ज्ञान असणं आवश्यक असणार आहे.
या पदभरतीसाठी पदवीधर उमेदवार पात्र असणार नाहीत.
वयोमर्यादा :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचं वय हे 18 ते 28 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. तसंच प्रवर्गानुसार वयोमर्यादेत सूट देण्यात येणार आहे.
काही महत्त्वाच्या सूचना
या पदांसाठी अर्ज हे केवळ पोस्ट किंवा स्पीडपोस्टद्वारे पाठवण्यात यावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
प्रत्यक्ष पाठवण्यात आलेले अर्ज किंवा अपूर्ण अर्ज पात्र असणार नाहीत.
उमेदवारांनी अर्जासोबत डोमेसाइल सर्टिफिकेट पाठवणं आवश्यक असणार आहे.
मागासवर्गीय किंवा OBC प्रवर्गातील उमेदवारांनी जातीचा दाखला पाठवणं आवश्यक असणार आहे.
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि इतर शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज पाठवण्याचा पत्ता : पंजाब नॅशनल बँक, मुंबई पश्चिम मंडल कार्यालय, पहिला मजला, अमन चेंबर्स, वीर सावरकर मार्ग, प्रभादेवी, दादर मुंबई – 400025
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 फेब्रुवारी 2022
फेब्रुवारी १०, २०२२
Tags :
नोकरी
Subscribe by Email
Follow Updates Articles from This Blog via Email




No Comments