IPPB ने इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने डिजिटल बचत बँक खाते बंद करण्याचे शुल्क लागू केले असल्याचे सर्वाना सुचित केले असल्याचे इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. हे शुल्क 150 रुपये + GST असेल आणि 5 मार्च 2022 पासून हे शुल्क आकारले जाईल. KYC अपडेट न केल्यामुळे डिजिटल बचत बँक (DGSB) खाते एका वर्षाच्या शेवटी बंद झाले तरच शुल्क लागू होईल. कोणत्याही व्यत्ययाशिवाय बँकिंग सेवांचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही IPPB अॅक्सेस पॉईंटला भेट देऊन एका वर्षाच्या आत तुमचे डिजिटल बचत खाते नियमित बचत खात्यात अपग्रेड करा, असं इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या वेबसाइटवर नमूद करण्यात आलेय.
डिजिटल सेव्हिंग बँक अकाउंटडिजिटल बचत बँक खाते खाते 18 वर्षांपेक्षा जास्त वयाची कोणतीही व्यक्ती ज्याच्याकडे आधार आणि पॅन कार्ड आहे ती सुरू करू शकते. यामध्ये मासिक सरासरी शिल्लक ठेवण्याची गरज नाही आणि खाते शून्य शिल्लक ठेवून उघडता येते.
Subscribe by Email
Follow Updates Articles from This Blog via Email




No Comments